जिंतूर : विवाहिता आत्महत्या प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

संभाजीनगर येथे एका ३२ वर्षीय विवाहितेने मानसिक व शारीरिक छळला कंटाळून राहत्या घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

जिंतूर : विवाहिता आत्महत्या प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल

जिंतूर - शहरातील संभाजीनगर (Sambhajinagar) येथे एका ३२ वर्षीय विवाहितेने (Married Women) मानसिक व शारीरिक छळला कंटाळून राहत्या घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी शुक्रवारी (ता. ०१) आत्महत्याग्रस्त महिलेच्या पती, मेव्हणा, सासू, सासरे यांच्यासह सात जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील हिस्सी येथील लता कुंडलिक साळवे या पतीसोबत मुंबई येथे राहतात. लतादीदींची धाकटी मुलगी जया हिचा विवाह २००५ यावर्षी परभणी जिल्ह्यातील कराळे येथील बाबासाहेब सुदाम गायकवाड यांच्याशी झाला होता. लग्नानंतर पती-पत्नी जिंतूर येथे संभाजीनगरात राहत होते. विवाहनंतरच्या आनंदी जीवनात जया-बाबासाहेब गायकवाड या दांपत्याच्या संसारवेलीवर दोन मुले जन्माला आली. पैकी पहिला मुलगा प्रज्वल (१४) जन्मताच मानसिक रोगी तथा मतिमंद असल्याने त्याला बोलता येत नाही. काहीच समजतही नाही. त्यामुळे आईच (जया) त्याची देखभाल करत असे.

ती आमच्या लाडक्या प्रज्वल या मुलाला शिक्षणासाठी कुठल्यातरी शाळेत पाठवण्यासाठी पतीकडे लकडा लावायची परंतु जयाचे पती बाबासाहेब गायकवाड हे जयाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे आणि हा अपंग मुलगा माझा नाही, दुसऱ्याचा कुणाचातरी आहे. त्यामुळेच तो मतिमंद जन्मला आहे, असे म्हणत त्यांच्यासह सासरे सुदाम गायकवाड, सासू शांताबाई सुदाम गायकवाड, दीर अनिल सुदाम गायकवाड, सत्वशीला अनिल गायकवाड, सुरेश सुदाम गायकवाड, लता सुरेश गायकवाड हे जयाचा नेहमी मानसिक व शारीरिक छळ करत होते. त्यातच जयाचे पती बाबासाहेब यांचे बाहेर कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचे लक्षात आले असता अत्याचारित जयाने जाचाला कंटाळून ३१ मार्च रोजी सकाळी घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत जया गायकवाड यांची आई लता कुंडलिक साळवे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता. ०१) रात्री जयाच्या पतीसह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३०६, ४९८, (अ) ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :crimewomen