संतापजनक! जालन्याचे लोकं का ऐकत नसतील बरं 

उमेश वाघमारे
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदचे आदेश दिले गेले होते. हे बंद आदेश व्यापाऱ्यांनी पाळले आहेत. आता नागरिकांनी सर्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरा राहणे अपेक्षित आहे.

जालना : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शनिवारी (ता.21) व रविवारी (ता.22) अत्यावश्यक सेवा वगळता जालना शहरासह जिल्हाभरात दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शनिवारी (ता.21) जालना शहर कडकडीत बंद होता. तर जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. दरम्यान शहरातील मार्केट बंद होते, तरीदेखील रस्त्यावर नागरिकांची गर्दी कायम होती. 

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी (ता.20) रात्री उशिरा जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाना दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शनिवारी (ता. 21) सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळत आपली दुकाने बंद ठेवली. तसेच पोलिसांकडून शहरात सतत गस्त सुरू होती. दरम्यान शहरातील कडकडीत बंद असतानाही रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळाली.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदचे आदेश दिले गेले होते. हे बंद आदेश व्यापाऱ्यांनी पाळले आहेत. आता नागरिकांनी सर्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरा राहणे अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market Closed Lock Down In Jalna Coronavirus News