नांदेडच्या महिलांना का होतो सासुरवास, वाचा कारणे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या घटना ताज्या असतांना जिल्ह्यात पुन्हा विविध घटनात तीन विवाहितांचा सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आला.

नांदेड : दिवसेंदिवस किरकोळ कारणावरून विवाहितांच्या छळाच्या घटनात वाढ होत आहे. महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या घटना ताज्या असतांना जिल्ह्यात पुन्हा विविध घटनात तीन विवाहितांचा सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आला. या प्रकरणी नायगाव, मुखेड आणि हिमायतनगर येथे गुन्हे करण्यात आले आहेत.

नायगाव तालुक्यातील पळसगाव येथील विवाहितेला, तु दिसायला चांगली नाहीस, तुझ्या माहेरच्यांनी दुसरी मुलगी दाखवून तुला आमच्या गळ्यात बांधले. तसेच पती तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. रुग्णालयात झालेला खर्च माहेराहून घेऊन म्हणून तिचा मानसिक व शारिरीक छळ करून उपाशी ठेवलून घरातून हाकलून दिले. या त्रासाला कंटाळून पीडीत विवाहितेच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. काळे करत आहेत.

हेही वाचाअर्धापूर दुय्यम निबंधक कार्यालयात ४० लाखाचा अपहार​

घर बांधकामासाठी २० लाखाची मागणी

दुसऱ्या घटनेत कंधार तालुक्यातील मरशिवणी येथील एका विवाहितेला लग्नानंतर काही दिवस सासरी चांगले नांदवले. त्यानंतर मात्र घर बांधकामासाठी २० लाख रुपये माहेराहून आणण्याचा तगादा लावून तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. तिला पती वेळप्रसंगी मारहाण करत असे. तसेच तिला उपाशी ठेवून घरातून हाकलून दिले. या त्रासाला कंटाळून तीने मुखेड पोलिस ठाण्यात जावून दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या मंडळीवर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस नाईक श्री. गारोळे करत आहेत.

येथे क्लिक करा - थकबाकीदारांनी घेतला धसका

शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी

तर तिसऱ्या घटनेत खडकी बाजार (ता. हिमायतनगर) येथे राहणाऱ्या विवाहितेला चैनिच्या वस्तु खरेदीसाठी माहेराहून दोन लाखाची मागणी करून तिचा छळ सुरू केला. एवढेच नाही तर तिला मारहाण करून शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिणे काढून घेऊन घरातून हाकलून दिले. २२ वर्षीय महिलेनी शेवटी हिमायतनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. ठाकरे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage in the district is underway - How to read it nanded news