शंभर टक्के मतदानासाठी लोकशाहीचा विवाहसोहळा

संगमेश्वर जनगावे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

चाकूर (जि. लातूर) : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्लुप्त्या शासनाकडून वापरण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शासनाचे विविध पुरस्कार मिळवलेल्या अलगरवाडी (ता.चाकूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केंद्रावर अनोखा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.

मंडप उभारून मंडपाला फुलांचे तारणे बांधण्यात आली आहेत. मतदानरूपी लग्न पत्रिकेचे बॅनर मंडपात लावून गावातील लोकांना हलगी, स्पीकर द्वारे मतदान केंद्रात मतदानासाठी येण्याचे आव्हान करण्यात आले. घरोघरी विवाह सोहळ्याला येण्यासाठी पत्रिका वाटप करण्यात आल्या. गावात ठिकाणी मतदान जनजागृती चे बॅनर लावण्यात आली आहेत. वृद्ध अपंगांना घरापासून मतदान केंद्र पर्यंत ने आण करण्यासाठी निवडणूक रथ व व्हीलचेअर ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

तालुक्यातील हे आदर्श मतदान केंद्र पाहण्यासाठी विविध पक्ष्यांचे उमेदवार, पदाधिकारी यांच्यासह अधिकारी मतदान केंद्राला येऊन भेट देत आहेत. शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी सरपंच गोविंदराव माकणे, उपसरपंच अंजेराव खटके, विकास स्वामी, पोलिस पाटील रमाकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष धिरज माकणे, डाॅ.गुरूनाथ सांगवे, निवृत्त मुख्याध्यापक बाबुराव ढोबळे, बापुराव चिटबोने, संगम पटणे, राम सांगवे यांच्यासह गावकरी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: marriage function for democracy