वाळूज महानगर - दोन मुली व एका मुलासह भाड्याच्या घरात राहत असलेल्या 34 वर्षीय विवाहितेवर 40 वर्षीय पती व 50 वर्षीय त्याच्या मित्राने वेळोवेळी अत्याचार केला. एवढेच नव्हे तर पतीच्या मित्राने पीडित विवाहितेच्या 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर सुद्धा अत्याचाराचा प्रयत्न केला. बजाजनगर येथे 2024 मध्ये घडलेली ही घटना शुक्रवारी (ता. 28) रोजी उघडकीस आली.
याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा, भोकरदन जिल्हा जालना येथील 34 वर्षीय पीडीतेचे लग्न नांदखेडा तालुका भोकरदन येथील सोमीनाथ वनारसे याच्याबरोबर 2007 मध्ये झाले.
लग्नानंतर दोघे पती-पत्नी रांजणगाव (शेणपुंजी) येथे किरायाच्या रूममध्ये राहत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. सोमीनाथ वनारसे हा 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये बिझनेस करण्यास गेले. त्यामुळे विवाहिता दोन मुली व मुलासह तेथेच राहत होती.
2020 मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सोमीनाथ याने बजाजनगर रूम करून दिली. तेव्हा तेथे वाहीद पठाण (वय-50) रा. पंढरपुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर याच्याशी ओळख करून दिली. आणि तो चांगला मित्र असल्याचे सांगितले. त्यावेळी वाहीद पठाण हा शेजारीच बजाजनगर येथे राहत होता.
2021 मध्ये सोमीनाथ वनारसे व त्याचा मित्र वाहीद पठाण असे दोघे रात्री 9 घरी वाजेच्या सुमारास घरी आले. तेव्हा मुले झोपलेली होती. त्यांनी शिवीगाळ करत दोघांनीही जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. तसेच जर याबद्दल कोणाला काही सांगितले, तर मुलीना जिवंत मारण्याची धमकी दिली. काही दिवसानंतर पिढीत विवाहिता मुलांसह बजाजनगर येथेच दुसरीकडे राहायला गेली.
2023 मध्ये रात्री अंदाजे 10 वाजेच्या सुमारास सोमीनाथ आणि वाहीद पठाण या दोघांनी दारू पिऊन पुन्हा पीडितेवर बलात्कार केला. तसेच वाहीद पठाण हा पती सोमीनाथ याच्या सांगण्यावरून 2024 मध्ये ती राहत असलेल्या रूम मध्ये आला. आणि तिच्या 17 वर्षीय मुलीला जवळ ओढून बलात्काराचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच त्याला रूमच्या बाहेर ढकलुन दार बंद करून घेतले. त्यानंतर पती आणि वाहीद पठाण हे मुलीच्या मागे लागतील म्हणून पीडित विवाहिता माहेरी गेली. आणि पती सोमीनाथ याच्यावर खावटीची केस केली. परंतु त्याने तिच्या सोबत चांगले राहणार, कसलाही त्रास देणार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे पीडित विवाहिता, मुलगी व मुलगा असे भोकरदन तालुक्यातील सासरी राहण्यास गेली, परंतु तेथे सोमीनाथ याने तीला औरंगाबाद येथे 'चल 'म्हणा. औरंगाबाद येथे जाण्यास पीडित विवाहितेने नकार दिल्याने त्याने तिला मारहाण केली. त्यामुळे ती पुन्हा माहेरी राहायला गेली.
त्यानंतर तो तिच्या मागे आला आणि औरंगाबाद येथे 'राहायला चल नाही तर तुला व तुझ्या भावास जिवंत मारू. अशी धमकी दिली. म्हणून तिला व तिच्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने तिने बदलापुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
त्यानंतर पीडीतेने तिच्यावर झालेल्या बलात्कार प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्याने आरोपी पती सोमीनाथ नारायण वनारसे (वय-40) रा. रांजणगाव (शे. पु.) ता. गंगापूर व त्याचा मित्र वाहीद इमरान पठाण (वय-50) रा. पंढरपुर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी पती व त्याचा मित्र या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.