Surekha Sabale
sakal
कन्नड - तालुक्यातील जेहूर येथे पती, सासू आणि सासरे यांच्या सततच्या जाचाला कंटाळून एका २९ वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी (ता.१७) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेखा संगम साबळे (वय २९, रा. जेहूर, ता. कन्नड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.