
बीड : माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहतीचा पतीसह सासरच्यांकडून छळ केला जात असल्याची घटना समोर आली. इस्लामपुरा, पेठ बीड येथील खाजाबी शफिक बेग (वय ४५) या विवाहितेने सासरच्या चार जणांविरुद्ध शारीरिक, मानसिक त्रास व पैशासाठी छळ केल्याची फिर्याद पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.