Murud Crime : अल्पवयीन मुलीसोबत विवाह करून अत्याचार; मुलीच्या आईसह चार जणांवर गुन्हा दाखल

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आईने जबरदस्तीने लग्न लावून दिले.
crime
crimeESakal
Updated on

मुरुड - येथील एका अल्पवयीन मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याबद्दल अल्पवयीन मुलीच्या आईसह, लातूर येथील तिचा पती, सासू व नणंद या चार नातेवाईकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित मुलीची आई दैवशाला शीलवंत हिने आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील जबरदस्तीने 26 एप्रिल 2024 रोजी लातूर येथील आरोपी सुरज सातपुते त्याच्यासोबत लग्न लावून दिले.

लग्नानंतर वारंवार तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करण्यात आले. काही काळानंतर तिची सासू व नणंद यांनी तुझ्या लग्नात घरगुती वापराचे सामान चांगले दिले नाही, म्हणून छळ केला.

शेवटी वैतागून अल्पवयीन विवाहित पीडितेच्या तक्रारीवरून मुलीची आई दैवशाला शिलवंत रा. पारुनगर, मुरुड, पती सुरज सुधाकर सातपुते, सासू सगुना सुधाकर सातपुते व मोठी नणंद सर्व राहणार वाले, इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे, खाडगाव रोड, लातूर या आरोपीवर मुरुड पोलीस ठाण्यात गुरन. 53/2025 कलम 64, 85, 3, 5 बी. एन. एस. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 12, 17 बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10, 11 नुसार गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि अशोक उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरगोजे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com