
देगलूर : भारतीय सैन्य दलात २०१७ मध्ये भरती झालेले मूळचे तमलुर ता. देगलूर येथील मूळ रहिवाशी असलेले शहरातील जिया कॉलनीमध्ये वास्तव्यास असणारे सचिन यादवराव वनंजे हे तंगधार जि. कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे कर्तव्याच्या मोहिमेवर जात असताना खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात त्यांना मंगळवार ता.६ रोजी दुपारी वीरमरण आले होते. मात्र ऑपरेशन सिंदूर मुळे काश्मीर भागात विमान उड्डानास परवानगी नसल्याने बुधवार ता. ७ रोजी सायंकाळपर्यंत सचिन वनंजे यांचा पार्थिवदेह श्रीनगर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयातच होता .त्यानंतर सेनादलाच्या मुख्यालयात सायंकाळी ७ वाजता शिफ्टिंग कोर कमांडर कडून त्यांना शेवटची मानवंदना देण्यात आली.