

Masarul Dam water storage has declined amid drought conditions and alleged illegal water lifting for agriculture.
esakal
पारध : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धरणातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, भविष्यात सुमारे ५० गावांतील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. अवैध पाण्याचा उपसा तातडीने थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आहे.