
उमरगा/येणेगुर (जि.धाराशिव) : तालुक्यातील येणेगुर येथील एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ, उलटीचा त्रास झाला. हा प्रकार नेमका कशामुळे झाला ते वैद्यकीय अहवाल आल्यानंतर समोर येईल. तथापि, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात ही घटना घडली.