Sarpanch Santosh Deshmukh: स्व. संतोष देशमुख यांच्या घरात चोरी; एकाच रात्रीत सहा घरं फोडली

Massajog village in Beed rocked by multiple thefts in a single night: केवळ घरफोड्यांवरच न थांबता, चोरट्यांनी शेतशिवारातही हैदोस घातला. मस्साजोग तलाव परिसरातील सुमारे ४० शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व तलावातील पाणबुडी मोटारींच्या तांब्याच्या केबल कापून नेण्यात आल्या.
Massajog robbery case

Massajog robbery case

esakal

Updated on

Beed Crime: केज तालुक्यातील मस्साजोग परिसरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. एकाच रात्री सहा घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी सुमारे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, गावातील तब्बल १८ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हे धाडस केले असून, यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com