
ईट : केज तालुक्यातील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी ईट येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी शहर दिवसभर बंद ठेवण्यात आले.