Hotel Fire : आमदार जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग; लाखोचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली

आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले.
Hotel Grand Sarovar Fire
Hotel Grand Sarovar Firesakal
Updated on

वाळुजमहानगर - आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने हॉटेलमधील कर्मचारी व ग्राहक तात्काळ बाहेर आल्याने या घटनेत जीवित हानी झाली नाही.

गुरुवारी (ता.10) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या 7 बंबांनी 10 ते 12 खाजगी टँकरच्या मदतीने सुमारे सव्वा तासात आटोक्यात आली. त्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरात सोलापूर धुळे महामार्गावरील तिसगाव शिवारात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे ग्रँड सरोवर नावाचे आलिशान हॉटेल आहे. विस्तीर्ण परिसरात 7 मजली ही हॉटेल असून त्यात 64 खोल्या आहेत. गुरुवारी (ता.10) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास या हॉटेलला आग लागली.

यामुळे भडकली क्षणार्धात आग -

हॉटेलच्या गॅलरीवर प्लास्टिकचे आकर्षक शेड तयार करण्यात आले आहे. शिवाय दिवसभर कडक ऊन असल्याने वातावरण तप्त होते. त्यामुळे क्षणार्धात आग भडकली आणि या आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले.

Massive Fire at MLA pradeep Jaiswal Hotel Grand Sarovar
Massive Fire at MLA pradeep Jaiswal Hotel Grand Sarovarsakal

दोन बाजू आगीच्या भक्षस्थानी -

या आगीत हॉटेल ग्रँड सरोवरची पूर्वेकडील म्हणजेच खवड्या डोंगरची बाजू आणि सोलापूर धुळे महामार्गाकडील दक्षिण बाजू अशा एल आकाराच्या दोन बाजू जळाल्या. त्यात हॉटेलमधील फर्निचर, एसी, फ्रिज, वायरिंग आदी साहित्यांचा समावेश आहे.

घटनास्थळी सात बंब, बारा टँकर -

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 7 बंब आणि जवळजवळ दहा ते बारा खाजगी टँकर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावून आले. त्यात वाळुज एमआयडीसी अग्निशमन दल, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, बजाज ऑटो लिमिटेड आणि गरवारे कंपनीच्या बंबांचा समावेश होता.

सव्वानऊ वाजता आगीवर नियंत्रण -

रात्री आठ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग सव्वा तासाच्या पथक परिश्रमानंतर म्हणजेच सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत हॉटेलचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.

सुदैवाने जीवित हानी टळली -

आग लागल्याचे समजताच हॉटेलमधील ग्राहक व कर्मचारी तात्काळ बाहेर पळाले. चार कामगार हॉटेलमध्येच अडकले होते. मात्र त्यांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याला पुष्टी मिळाली नाही. मात्र सुदैवाने या आगीच्या घटनेत मोठी जीवित हानी टळली.

आगीचे कारण अस्पष्ट -

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान हॉटेल मालक आमदार प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार यांच्यासह आमदार जैस्वाल यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वरिष्ठ पोलिसांकडून पाहणी -

वाळूज परिसरात हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड, गणेश गिरी, पोलीस अंमलदार योगेश शेळके, विक्रम वाघ आदींनी घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी पांगवत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान पोलीस आयुक्त प्रवीण पवार व पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com