Fire Accident : पाचोड येथे विजेच्या शॉर्ट सर्किटने पीव्हीसी पाईपच्या गोडावूनला आग लागून नव्वद लाखाची हानी
Pachod News : पाचोड येथे शॉर्ट सर्किटमुळे पीव्हीसी पाईपच्या गोदामाला मध्यरात्री आग लागून नव्वद लाखांचे साहित्य जळून खाक झाले. गोदाम, शेजारची दुकाने आणि नव्याने उभारलेली इमारत यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पाचोड : विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे पीव्हीसी पाईपच्या गोडावूनला आग लागून नव्वद लाखाची हानी झाल्याची घटना धूळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१५) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.