Lake Fish Deaths : देवगाव तलावातील मासेमृत्यूने खळबळ; दुर्गंधी, दूषित पाण्याची शंका असून प्रशासनावर तपासणी टाळल्याचा आरोप

देवगाव लघु सिंचन तलावातील हजारो मासांचा मृत्यू; दूषित पाणी आणि वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत भीती, प्रशासनाकडून तपासणीचा अभाव
Massive Fish Kill at Devgaon Irrigation Tank

Massive Fish Kill at Devgaon Irrigation Tank

Sakal

Updated on

आडूळ : पैठण तालुक्यातील देवगाव येथील लघु सिंचन तलावात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मासे मृत होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दररोज हजारो मासे तलावाच्या कडेला मृत अवस्थेत आढळून येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com