Badnapur News : बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार उघड; पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

बदनापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेत सोन्यांच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून बँकेची सुमारे सात कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Canara Bank Badnapur

Canara Bank Badnapur

sakal

Updated on: 

बदनापूर - येथील कॅनरा बँकेच्या शाखेत सोन्यांच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून बँकेची सुमारे सात कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. व्ही. केशवमूर्ती यांच्या तक्रारीवरून बँकेचे शाखा व्यवस्थापक, बँकेचे अधिकारी आणि सुवर्ण मूल्यमापक यांच्यावर संशय व्यक्त करीत बदनापूर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com