
छत्रपती संभाजीनगर : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील आदर्श महाविद्यालयाच्या केंद्रावर सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. एका तुकडीला केवळ १२० विद्यार्थ्यांचीच मान्यता असताना येथे तब्बल ६७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिरिक्त विद्यार्थी आले कुठून? या विद्यार्थ्यांची अधिकृत नोंद आहे का? हे विद्यार्थी नेमके कोणत्या महाविद्यालयाचे आहेत आदी प्रश्न निर्माण होत आहेत.