
लातूर: येथे एमडी ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने शुक्रवारी (ता. ११) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेला एक जण मुंबईचा आहे. त्यामुळे मुंबईतून लातूरला ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे.