Murud News : 108 रुग्णवाहिका सेवेचा हलगर्जीपणा; गंभीर रुग्ण अर्धा तास रस्त्यावर

मुरुड येथे महाराष्ट्र आप्तकालीन वैद्यकीय सेवा च्या (108) रुग्णवाहिका सेवेतील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार आला उघडकीस.
108 ambulance service issue

108 ambulance service issue

sakal

Updated on

मुरुड - मुरुड येथे महाराष्ट्र आप्तकालीन वैद्यकीय सेवा च्या (108) रुग्णवाहिका सेवेतील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला असून, विजेचा धक्का लागून भाजलेल्या एका गंभीर रुग्णाला लातूर येथे उपचारासाठी नेत असताना भर रस्त्यातच रुग्णवाहिकेचे पार्ट गळून पडल्याची धक्कादायक घटना घडली. जवळपास 38 डिग्री तापमान असलेल्या रस्त्यावर अगोदरच भाजलेला रुग्ण अर्धा तास रुग्णवाहिकेत मदतीसाठी तळमळत होता. शनिवारी ता. 25 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुरुड बस स्थानका जवळ ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com