esakal | बीड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांचा अपघातात मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

accident

अपघातात जखमी झालेल्या तालुक्यातील टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव क्षीरसागर यांचा मंगळवारी (ता. 25) पुणे येथील दवाखान्यात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

बीड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांचा अपघातात मृत्यू

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड): अपघातात जखमी झालेल्या तालुक्यातील टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव क्षीरसागर यांचा मंगळवारी (ता. 25) पुणे येथील दवाखान्यात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

डॉ. क्षीरसागर हे गुरुवारी (ता. 20) आष्टी येथून नगरकडे खासगी कामानिमित्त एकटेच त्यांच्या कारने गेले होते. नगर-बीड रोडवर दशमीगव्हाण (ता. नगर) येथे रस्त्यावरील खड्डे चुकविताना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका खड्ड्यात जोराचा दणका बसला. त्यांच्या कारचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. 

या अपघातात कारमध्ये एकटेच असलेले डॉ. क्षीरसागर हे डोक्यास व छातीस मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते. दशमीगव्हाण बसथांब्यावर या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने कारचे दरवाजे फोडून बाहेर काढत रुग्णवाहिका बोलावून नगर येथे उपचारांसाठी हलविले. मात्र, प्रकृती बिघडल्याने नगर येथून त्यांना पुणे येथे उपचारांसाठी हलविण्यात आले होते. मंगळवारी (ता. 25) पुणे येथे उपचारांदरम्यान डॉ. क्षीरसागर यांचा मृत्यू झाला.

संपादन - सुस्मिता वडतिले