पीएफचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आता प्रत्येक सोमवारी बैठक

प्रकाश बनकर
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

त्येक सोमवार कर्मचारी भविष्य निधी संगठन, क्षेत्रीय कार्यालय टाऊन सेंटर सिडको एन-एक येथे क्षेत्रीय आयुक्‍त एम. एच. वारसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

औरंगाबाद : भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे पीएफसंदर्भात असलेल्या समस्या, प्रश्‍न आणि तक्रारी निवारण्यासाठी निधी तुमच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर आता दर सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. यात पीएफसंबंधीच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएफचे सहायक आयुक्‍त तुषार जाधव यांनी दिली. 

प्रत्येक सोमवार कर्मचारी भविष्य निधी संगठन, क्षेत्रीय कार्यालय टाऊन सेंटर सिडको एन-एक येथे क्षेत्रीय आयुक्‍त एम. एच. वारसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. सोमवारी सुटी आल्यास ही बैठकी पुढील कार्यालयीन दिवसात होणार आहे, असेही पीएफ कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting now every Monday to solve PF problems