MP Supriya Sule : न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार; मस्साजोग येथे घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट

सुसंस्कृत असलेल्या बीड जिल्ह्याची चार-पाच लोकांच्या वागण्यामुळे बदनामी झाली. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आहे.
mp supriya sule and ashwini deshmukh
mp supriya sule and ashwini deshmukhsakal
Updated on

बीड - सुसंस्कृत असलेल्या बीड जिल्ह्याची चार-पाच लोकांच्या वागण्यामुळे बदनामी झाली. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आहे. त्यांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदर पसरू, माणुसकीच्या नात्याने हा लढा लढू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांना सांगितले.

खासदार सुळे यांनी मंगळवारी मस्साजोग (ता. केज) येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. पक्षाचे गटनेते, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते. सुळे यांनी घरात प्रवेश करताच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्‍विनी यांनी त्यांची गळाभेट घेतली.

सुळे म्हणाल्या, ‘एवढ्या कठीण परिस्थितीतही देशमुख कुटुंब समजूतदारपणे वागत आहे. हा राजकारणाचा विषय नाही. माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार आहे. महाराष्ट्रात माणुसकी विसरली जात आहे का, असा प्रश्न आहे. आपले मुख्यमंत्र्यांसोबत मतभेद असले तरी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर आठ दिवसांत न्याय मिळेल, अशी माझीही अपेक्षा होती. या राज्यात अशी कुठलीही कृती सहन केली जाणार नाही, असा ‘सिग्नल’ वरिष्ठ पातळीवरून द्यायला हवा होता. जिल्ह्यात काही लोकांच्या भीतीमुळे लोक बोलायलाही तयार नव्हते. आता वाचा फुटत आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे’.

नैतिकतेचा मुद्दा आणि राजीनामा

मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सध्या या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर यापूर्वी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याची अनेक उदाहरणे आहेत’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com