Umarga News : महाआरोग्य शिबीरात हजारो रुग्णांची झाली तपासणी, मोफत औषधोपचार

युवा नेते शरण पाटील यांच्या नियोजनामुळे हजारो रुग्णांना मिळाला दिलासा.
Mahaaarogya Shibir Inauguration
Mahaaarogya Shibir Inaugurationsakal
Updated on

उमरगा - शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (ता. चार) आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीरात विविध आजारावरील तपासणी व औषधोपचाराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. दरम्यान ग्रामीण भागातुन आलेले असंख्य जेष्ठ नागरिक, महिलांची तपासणीसाठी मोठी गर्दी झाली होती. युवा नेते शरण पाटील यांच्या नियोजनामुळे शहरात प्रथमच अत्यंद नियोजनबध्द पद्धतीने झालेल्या महा आरोग्य शिबीराचा हजारो नागरिकांना लाभ मिळाला.

माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार अध्यक्षस्थानी होते.

या वेळी जेष्ठ नेते प्रदिप राठी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेखर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, डॉ. उदयसिंह मोरे, बाजार समितीचे सभापती विश्वनाथ कस्तुरे, आळंदचे विठ्ठलराव पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, ॲड. व्ही. एस. आळंगे, संगमेश्वर ठेसे, अनिल उर्फ पप्पु सगर आदींची उपस्थिती होती.

या वेळी महाआरोग्य शिबीराचे संयोजक शरण पाटील यांनी प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की, सामाजिक, राजकिय जीवनात सेवाधर्म जोपासला पाहिजे. लोकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यामागे मोठे आत्मिक समाधान मिळते. महाआरोग्य शिबीरात हजारो रुग्णांची तपासणी करून औषधोपचार झाले. गरजुंच्या शस्त्रक्रियेचेही नियोजन करण्यात आले असून शेवटपर्यंत त्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची राहिल. असा आत्मविश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी श्री. राठी यांचे भाषण झाले. श्रमजीवी फॉर्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर यांनी शरण पाटील फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी सांगितली. सतीश हानेगावे यांनी सूत्रसंचलन केले तर प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी आभार मानले.

बसवराज पाटील राजकारणातील संत !

सात्विक विचाराची शिदोरी घेऊन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी राजकारण व समाजकारण केले, त्यांचाच आदर्श घेत शरण पाटील यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहेत. जनतेच्या कल्याणासाठी सार्वजनिक हिताचे निर्णय घेऊन लोकांचा उद्धार होण्यासाठी  राज्यातील देवेंद्र फडणवीस व केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकारचे काम सुरु आहे.  धाराशिव, लातूर जिल्ह्याच्या राजकारणात बसवराज पाटील यांचे कार्य संतासारखे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम सुरु असल्याचे माजी केंद्रिय मंत्री खुबा यांनी बोलताना सांगितले.

आरोग्य सुविधांसाठी सामुहिक प्रयत्नाची गरज

धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून शेतकरी कष्टकरी, महिलांना, बालकांना चांगले आरोग्य देण्यासाठी हे शिबिर महत्वाचे असून हा पुण्याचा यज्ञ आहे.

शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने जिल्ह्यातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी आगामी काळात काम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.

दहा हजार रुग्णांची नोंदणी

महा आरोग्य शिबीरात विविध आजाराच्या तपासणीसाठी धाराशिव, लातूर जिह्यासह लगतच्या कर्नाटक राज्यातील जवळपास दहा हजार रुग्णांनी नोंदणी केली. आणि संबंधित आजाराच्या तज्ञ डॉक्टराकडून तपासणी करून, औषधे घेण्यात आली. विशेषतः ऱ्हदयरोग व डोळ्याच्या तपासणीसाठी मोठी गर्दी होती. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत तपासणी व उपचारासाठी बरेच रुग्ण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com