esakal | व्यापाऱ्याची दादागिरी : पोलिसाची लाठी हिसकावून केली शिवीगाळ; जिंतूर येथील प्रकार

बोलून बातमी शोधा

जिंतूर पोलिस
व्यापाऱ्याची दादागिरी : पोलिसाची लाठी हिसकावून केली शिवीगाळ; जिंतूर येथील प्रकार
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : संचारबंदीच्या काळात दुकान चालू गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दुकान बंद करण्याची विनंती करताच संतप्त सदरील किराणा दुकानदाराने पोलिस उपनिरीक्षकाच्या हातातील लाठी हिसकावून घेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुला समोर घडला. या प्रकारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील बलसा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ऋषिकेश प्रोव्हिजनचे मालक प्रल्हाद टाकरस हे संचारबंदीच्या काळात आपले दुकान उघडून बिनधास्त व्यापार करत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी संचारबंदीच्या काळात दुकान बंद ठेवण्याची विनंती सदरील दुकादारास केली. त्यामुळे रागाने संतप्त झालेले दुकानदार टाकरस यांनी पोलिसांसोबत वाद घालू लागला तेंव्हा

पोलिसांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला

उलट त्याने पोलीस अधिकाऱ्यासच एकेरी भाषेत बोलण्यास सुरुवात करुन पोलिस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या हातातील लाठी हिसकावून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन त्यांच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर पोलिसांनी त्यास पकडून 'पोलिसी हिसका' दाखवला हा प्रकार सुरु असताना बघ्यांची गर्दी जमा झाली होती. एकीकडे पोलिसांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत केल्या जाते. तर दुसरीकडे भर चौकात व्यापाऱ्याकडून पोलिस अधिकाऱ्यावर अर्वाच्च भाषा वापरुन लाठी हिसकावून दहशत निर्माण करणे हे अशोभनीय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे