

Delay in MGNREGA Irrigation Well Approvals
sakal
कन्नड : तालुक्यातील कविटखेडा–हसनखेडा गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत प्रस्तावित सिंचन विहिरींच्या १८ संचिका गेल्या अनेक महिन्यांपासून पंचायत समितीतील मनरेगा विभागाच्या कार्यालयात मंजुरीविना पडून असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश पवार यांनी मंगळवारी (ता. ३०) पंचायत समिती कार्यालयात योगेश पवार यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला.