esakal | भाटेगावात आढळला दुर्मिळ 'मसण्याऊद' प्राणी; पहा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

mhasnyaud

भाटेगावात आढळला दुर्मिळ 'मसण्याऊद' प्राणी; पहा फोटो

sakal_logo
By
मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील एका खाजगी शाळेच्या बांधकामात सिमेंटच्या खांबामध्ये बुधवारी (ता. २१) मसण्याऊद व त्याची चार पिल्ले आढळून आली आहेत. हिंगोली येथील सर्पमित्रांनी तातडीने शाळेत जाऊन त्यांना ताब्यात घेतले असून वन विभागाच्या हवाली केले आहे.

मसण्याऊद व त्याची चार पिल्ले आढळून आली आहेत

मसण्याऊद व त्याची चार पिल्ले आढळून आली आहेत

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहे. येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने साफसफाईचे काम सुरू होते. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. येथील खांब भरण्याचे काम शिल्लक असल्याने बुधवारी खांब भरण्याच्या कामाची पाहणी करीत असताना त्यात एक प्राणी व त्याची चार पिल्ले दिसून आली.

हा प्राणी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेत गर्दी केली होती

हा प्राणी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेत गर्दी केली होती

हा प्राणी कोणता आहे याची ओळखही कोणाला नसल्याने सर्पमित्र प्रेमकुमार गावंडे यांनी तातडीने हिंगोली येथील सर्पमित्र विजयराज पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाटील यांच्यासह चार ते पाच जण भाटेगाव येथे पोहचले त्या ठिकाणी पाहणी केली असता तो प्राणी मसण्याऊद असल्याचे सर्पमित्र पाटील यांनी सांगितले. त्यांनी मसण्याऊद व चार पिल्ले खांबातन बाहेर काढली त्यांना एका पोत्यात बांधून हिंगोलीत आणले व नंतर वन विभागाच्या हवाली करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. हा प्राणी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेत गर्दी केली होती.

loading image