- रविंद्र गायकवाडबिडकीन - शहरातील पोलिस ठाणे हद्दीतील सोमपुरी हद्दीतील बिडकीन ते सोमपुरी रोडवरील सोम ॲटो कंपनीमध्ये काम करत असलेल्या एका ३५ वर्षीय मशीन ऑपरेटरचा मशीनमध्ये डोके अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे..मयत मशीन ऑपरेटर चे नाव कृष्णा ब्रिजमोहन कुमार, (वय-३५वर्षे) रा. बेलाई, ता. पननी, जिल्हा. रिवा, मध्यप्रदेश असे नाव आहे. सोम ॲटो कंपनीमध्ये CNC मशीन मध्ये असलेल्या PDC मशीन मध्ये ॲल्युमिनियम चे पार्ट वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचे काम केले जातात..कृष्णा कुमार हा PDC मशीन वर ऑपरेटिंग सिस्टीम चालवत मागील ७ ते ८ वर्षांपासून काम करत होता.आज ता. ०९ रोजी सकाळी ०७ वाजेदरम्यान नियमितपणे सकाळी कामावर आला होता. कामावर रुजु झाल्यानंतर अंदाजे ०७:१५ ते ०७:४० च्या दरम्यान हि PDC मशीन ऑपरेटिंग करत असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती इतर कामगारांनी दिली आहे..याबाबत कामगारांच्या वतीने सोम ॲटो कंपनीमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेतून शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, पोलिस नाईक संजिवन कदम व पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत पाहणी करत पंचनामा करत अहवाल सादर केला आहे..या घटनेची बिडकीन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी झिंजुर्डे हे करित आहेत. याबाबतीत कंपनी गेटवर माहिती विचारली असता कंपनी व्यवस्थापन व मानव संसाधन विभाग तसेच सुरक्षारक्षक यांच्या वतीने कुठलीही माहिती देत नसल्याचे दिसून आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.