वेळेआधी दूध गाडी आल्याने रस्त्यावर ओतले दूध 

कैलास मगर 
सोमवार, 16 जुलै 2018

औरंगाबाद : स्वाभिमानाने राज्यभर दुध बंद आंदोलन उभारल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा दुध उत्पादक संघाने दुध संकलनाच्या गाड्या वेळेआधी दूध संकलन केंद्रावर बोलावून घेतल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील भवन (ता.सिल्लोड) येथे सोमवारी (ता. 16) सकाळी बहुतांश दुध उत्पादकांना नाईलाजाने दुध रस्त्यावर फेकून द्यावे लागले.

शेतकरी संघटनेने राज्यात पुकारलेल्या आंदोलनाचा फटका दुध वाहतुक करणाऱ्या गाड्यांना बसु नये यासाठी सकाळी दुध डेअरीवरुन दुधाचे कॅन वाहुन नेणाऱ्या वाहनांच्या चालकांना नियमित वेळेच्या तासभर अगोदर आहे त्या परिस्थितीत दुधाच्या कॅन घेऊन येण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे वेळेवर आलेल्या शेतकऱ्यांना दुधाचे वाहन निघुन गेल्यामुळे दुध डेअरीत दुध घालता आले नाही. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दुध परत नेले तर काहींनी दुध रस्त्यावर सांडून निषेध व्यक्त केला. यामुळे भवन येथील दुध शितकरण केंद्रावर दररोजच्या तुलनेत दूध संकलन झाले नाही.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन दुधाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना नेहमीपेक्षा काही वेळ अगोदर बोलाविले.त्यामुळे दुध दररोजच्यापेक्षा थोडे कमी संकलन झाले. सायंकाळी नेहमीप्रमाणे संकलन केले जाईल.      
- सुभाष सोनवणे, केंद्र प्रमुख, दुध शितकरण केंद्र, भवन, जिल्हा दुध संघ, औरंगाबाद

Web Title: milk agitation milk Poured on road