Video: भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

file photo
file photo

परभणी : जलशुद्धीकरण केंद्रापासून शहराला जोडणारी पाइपलाइन शहराच्या जायकवाडी कालव्याच्या जवळ मंगळवारी (ता. २६) लिकीज झाली. भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय मात्र होताना दिसून येतो.

महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेपासून शहरापर्यंत पाणी आणण्यास वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. कधी पाइपलाइन फुटते, तर कधी लिकीज होते. त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. महापालिकेने अजूनही सदरील सदरील योजना आपल्या ताब्यात घेतली नसल्याचे समजते. त्यामुळे जोपर्यंत योजनेचे महापालिकेकडे हस्तांतरण होत नाही, तोपर्यंत संबंधित एजन्सीला ही कामे करणे अभिप्रेत आहे. तसेच वारंवार होणाऱ्या या  प्रकारातील तांत्रिक दोषदेखील दूर करणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या यूआयडीएसएसएमटी व अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली आहे. येलदरी ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आलेल मुख्य जलवाहिनी अनेक वेळा फुटते, लिकीज होत असल्याचे दिसून येते. तसेच जलशुद्धीकरण केंद्रापासून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीवरदेखील वारंवार असे प्रकार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प करून दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. 
जलशुद्धीकरण केंद्रापासून शहराला जोडणारी पाइपलाइन शहराच्या जायकवाडी कालव्याच्या जवळ मंगळवारी लिकीज झाली. त्यातून १५-२० फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. एक प्रकारचे कारंजे निर्माण झाले होते. महापालिकेने तत्काळ त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.


हेही वाचा व पहा : Video : विलगीकरणातील पोलिस कर्मचाऱ्यांना सोडले वाऱ्यावर...!
  
धबधब्यानंतर कारंजे
काही दिवसांपूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यानगर येथील जलकुंभ ओव्हर फ्लो  झाला होता. काही तास पाणी जलकुंभावरून खाली धबधब्यासारखे कोसळत होते. परभणी करांनी हा कोसळता धबधबा पाहिला होता, आता त्यांना कारंजे पाहण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

दोष काढणे गरजेचे
नवनियुक्त आयुक्त देविदास पवार हे मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत. तसेच परभणी शहरात त्यांचे शिक्षण झालेले आहे. येथेच ते काही काळ नोकरीलादेखील होते. त्यामुळे शहराच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यांनी वारंवार होणाऱ्या बाबींची चौकशी करून त्यातील दोष काढणे गरजेचे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com