Mini Ministry Election : मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीकडे आता लक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कालावधी संपून उलटले २१ महिने
Sanjay Raut : संजय राऊत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या निवडणुकांचा कालावधी २१ महिने उलटला असून, मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
जाफराबाद : नेत्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कालावधी संपून २१ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी निवडणूक जाहीर झाली नाही.