
देगलूर : देशाच्या संरक्षणार्थ वीरमरण पत्करलेले शहीद सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबाला केंद्र व राज्य सरकारकडून नियमाप्रमाणे देय असलेल्या सुविधा व योजना तात्काळ व घरपोच कशा मिळतील यासाठी मी स्वतः लक्ष घालित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामहून मला देगलूरला पाठवल्याचे सांगत देशाप्रती प्राणाची अहुती देणाऱ्या कुटुंबाला हे शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अतुल सावे यांनी देगलूर येथील शहीद सचिन वनंजे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधताना दिली.