.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चाकूर : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर भरण्यासाठी तांत्रीक अडचण येत असली तरी झालेल्या पावसाच्या आकडेवारीवरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. तालूक्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मंगळवारी (ता.३) पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली.