

beed police
esakal
Beed Latest News: एखाद्याचे आयुष्यच संघर्षमय आणि अन्याय व अत्याचार सहन करण्यासाठी असते का, असा संतापजनक प्रश्न बीड तालुक्यातील अल्पवयीन विवाहितेवरील अत्याचाराच्या घटनेने पडला आहे. १३ व्या वर्षीच तिचा विवाह झाला. आता १७ वर्षाच्या या अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन तिला गावातील चावडीत खांबाला बांधण्यात आले. तिला सोडण्याऐवजी तिला बांधल्याची व्हिडीओ शूटींग केल्याचा असंवेदनशिलपणाही समोर आला आहे.