
धाराशिवमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. तिच्या वडिलांसह कुटुंबियांना धमकी देत आरोपींनी अत्याचार केले. तीन आरोपींपैकी एक जण मुलीचा प्रियकर असल्याचं समजते. त्यानं लग्नाचं आमिष दाखवून तरुणीशी संबंध ठेवले. यानंतर लग्नाबाबत बोलायचंय म्हणत तिला शेतात नेलं. तिथं २ मित्रांसोबत मिळून आळीपाळीने अत्याचार केले.