मुरुड - राज्य शासनाकडून एकीकडे लाडक्या बहिणीना प्रत्येक महिन्याला मानधन देऊन खुश करत असताना महिला अत्याचाराच्या घटना मात्र कमी होताना दिसत नाहीत. मुरुड, ता. लातूर येथे राहणाऱ्या पर राज्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून लॉजवर घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ बनवून परत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बुधवार ता 23 रोजी पहाटे मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.