उदगीर - शहरातील विकास नगर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे एका आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता.३० मार्च रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विकास नगर येथील एका बिल्डिंगमधील एका खोलीत ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असताना आरोपी आशिष प्रविण धोरपडे हा तेथे आला..यावेळी मैत्रीण बाहेर गेल्यानंतर मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. “मला तू आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे म्हणत आरोपीने जबरदस्तीने तिच्याजवळ येऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीस दूर ढकलून तेथून पळ काढला..या प्रकरणी पीडितेने सोमवारी (ता.६) रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तारू हे करत आहेत..दरम्यान, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.