ST Bus Fire
sakal
खुलताबाद - छत्रपती संभाजीनगर-धुळे हायवेवर आज दुपारी एक थरारक घटना घडली. शहादा डेपोची एक एसटी बस अचानक गरम (ओव्हरहीट) झाल्याने तिला भीषण आग लागली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारातील आम्रपाली हॉटेलसमोर दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने, बसमधील प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असतानाच ही आग लागल्याने मोठा अनर्थ टळला.