हिंगोली : त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली, त्यात वयाची सत्तरी ओलांडली. औषधोपचार घ्यायलाही त्यांचा नकारच असायचा. अशात अचानक ते गावातून गायब झाले. घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली, पण ते काही सापडले नाहीत..असे करत करत २० वर्षे लोटली! एक दिवस अचानक फोन आला आणि ‘ते’ सापडल्याचा निरोप आला! तो ऐकून घरचेही आनंदले आणि तातडीने येऊन घरी घेऊन गेले! एखाद्या चित्रपटाला साजेसी ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कुटुंबात घडली..येथील जिल्हा रुग्णालयात १६ जुलै रोजी एका अनोळखी रुग्णाला अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना नाव-गाव विचारले असता तुकाराम देवजाळे (रा. दत्तरामपूर) एवढेच त्यांनी सांगितले. तुकाराम यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अमोल वाढे यांनी दत्तरामपूर गावाचा शोध घेतला..यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात दत्तरामपूर नावाचे गाव असल्याचे समजले. त्यानुसार आर्णी पोलिस स्टेशनचे कर्मचारी नीलेश सुरडकर यांच्याशी संपर्क करून दत्तरामपूर येथून त्यांच्या नातेवाइकांचा संपर्क क्रमांक मिळवला. रुग्णाचा फोटो त्यांनी लगेच दत्तरामपूर येथील दीपक देवतळे यांना पाठवला. देवतळे यांनी ‘हे आमचे काका असून यांचे नाव चांगदेव मुकुंदराव देवतळे’ असल्याचे सांगितले. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक वाढे यांनी दीपक देवतळे यांच्याशी संपर्क करून त्यांची माहिती घेतली असता सदरील रुग्णाचे लहान भाऊ व मुलगा यवतमाळ येथे राहत असल्याचे समजले..ते गेली वीस वर्षे आमच्या संपर्कात नाहीत. आम्ही त्यांचा शोध घेतला. परंतु, ते आजपर्यंत आम्हाला भेटले नाहीत. आम्ही त्यांना घेण्यासाठी हिंगोली येथे येतो, असे सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (ता. २५) शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात चांगदेव देवतळे यांना त्यांचे बंधू व मुलगा यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. भालेराव, डॉ. बोधीकर, परिचारिका कटके, आघाव यांनी उपचार केले..चांगदेव वीस वर्षे होते कुठे?कुटुंबीयांनी सांगितले, की चांगदेव देवतळे (वय ७२) यांना एक मुलगा एक मुलगी, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. पत्नीचे निधन झाले. ते मजुरी करायचे. त्यांचे बंधू काशीनाथ देवतळे हे मुंबईत नोकरी करत होते. मोठ्या भावावर त्यांचे अपार प्रेम. पण, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांनी मुंबई येथील नोकरी सोडून यवतमाळ येथे नोकरी केली. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण काशीनाथ यांनी केले. भाऊ चांगदेव यांना ते दवाखान्यात नेत. औषधोपचार सुरू केले. मात्र, चांगदेव हे औषध गोळ्या घेत नसत, फेकून देत होते. असे बरेच दिवस सुरू होते. खूप प्रयत्न करून त्यात काही फरक पडला नाही. नंतर ते कधी घरी येत, कधी येत नसत. कधी कधी तर त्यांना शोधून आणावे लागत होते..Nagpur University: पीएच.डी.चा शोधप्रबंध सादर करा ऑनलाइन; विद्यापीठाची नवी नियमावली, विषयातील तज्ज्ञांना मिळतील ऑनलाइन पत्रे.एक दिवस ते गाव सोडून गेल्यावर काही दिवस त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. त्यामुळे आम्ही शोध घेणे बंद केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. काही दिवसांनंतर त्यांचा अपघात झाला, असे काही जण सांगत होते. नंतर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली, पण शोध लागला नाही. तब्बल वीस वर्षे ते कुठे होते, हे त्यांनी अद्याप सांगितलेले नाही. आता हिंगोली येथून फोन आला आणि आम्ही तातडीने येथे येऊन त्यांना घरी घेऊन आलो. आल्यावर त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी परत दाखल केल्याचे काशीनाथ यांनी सांगितले. भावाची यापुढेही काळजी घेईन, असेही त्यांनी नमूद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.