महाविकास आघाडी सरकारच्या काळात पवारांनी ठाकरे सरकार जाऊन मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यावे असे साकडे तुळजा भवानीला घातले होते.
औसा : औशाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील नाते संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. महाविकास आघाडीच्या काळात आमदार अभिमन्यू पवार यांनी तुळजा भवाणीला नवस बोलला होता की, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यावे. जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर औसा ते तुळजापूर पायी चालत जाऊन देवीचे दर्शन घेणार आणि बोललेला नवस पूर्ण करणार असे तुळजापूर येथे घोषणा केली होती.