
धाराशिव : धाराशिव-बार्शीच्या सीमेवरील येडशी परिसरात गायीवर हल्ला करणारा वाघच आहे. हा वाघ यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून या ठिकाणी आला आहे, अशी माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सदर मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनात मांडला असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.