नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या : आमदार बोर्डीकर

MLA Meghna Sacore-Bordikar has demanded the government to provide financial assistance to the affected farmers. 2.jpg
MLA Meghna Sacore-Bordikar has demanded the government to provide financial assistance to the affected farmers. 2.jpg

जिंतूर (परभणी) : अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शासनाला केली आहे. 

यासंदर्भात आ.बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शुक्रवारी (ता.१९) मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. १८ व १९ फेब्रुवारी जिंतूर मतदारसंघासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस, ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग व इतर सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडल्याने हवालदील झाले आहेत.

अगोदरच कोरोना संसर्गामुळे कमी झालेले ऊत्पन्न, पूर्णपणे न मिळालेली कर्जमाफी, मंजूर होत नसलेली पीककर्ज प्रकरणे, मागील अतीवृष्टीत चुकीच्या निकषांमुळे मदतीपासून वंचित राहिलेले शेतकरी, विमा तक्रारी ऑनलाईन न नोंदवू शकल्यामुळे विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. या सर्व बाबींमुळे शेतकरी हैराण झालेले असताना या अवकाळी पावसाने बळीराजा पुर्णतः कोलमडून पडला आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीची आर्थिक मदत ऊपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती निवेदनात केली असून भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन पाठवले आहे.

कृषी विभागाचे आवाहन 

दरम्यान, अवकाळी पावसामुळे ज्या काही ठिकाणी हरभरा व रब्बी ज्वारी पिकाची काढणी सुरू असून पीक काढून शेतात पसरून ठेवले आहे. त्यामुळे कापणी केलेल्या किंवा रब्बी हंगामातील उभ्या पिकाच्या नुकसानीची शक्यता आहे. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हरभरा रब्बी ज्वारी किंवा गहू या पिकांचा विमा काढला असेल व अवकाळी पावसामध्ये विमा काढलेल्या पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत पिक नुकसानीची नोंद विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांक किंवा पीएमएफबीवायच्या माध्यमातून नोंदविणे आवश्यक आहे, असे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com