

MLA Prashant Bamb conducts surprise raid on illegal sand mining in Gangapur taluka
Sakal
शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा महसुली मंडळात आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी उशिरा अचानक पाहणी करत अवैध वाळू वाहतूक व अवैध वाळूसाठ्याविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान संशयित दोन अवजड वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली, तर शिवपूर,शेंदूरवादा परिसरातील अवैध वाळूसाठ्यावर धाड टाकून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महसूल विभागातील काही अधिकारी कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अवैध उत्खननाला खतपाणी मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.