Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी आमदार राजू नवघरे यांनी शुक्रवारी दिली भेट.
Manoj jarange Patil and MLA Raju Navghare

Manoj jarange Patil and MLA Raju Navghare

sakal

Updated on

हिंगोली - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे यांनी शुक्रवारी (ता. ४) उपोषणस्थळी भेट देऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार नवघरे यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिक ठामपणे त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com