
वसमत : वसमत परभणी महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोरील नगर परिषदेची जागा भूमाफियांनी हडप केली. यावर आमदार राजु नवघरे यांनी मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र समोरील येणारा निवडणुकांचा असल्याने या प्रकरणावर कारवाई झाली नाही. आता पुन्हा एकदा आमदार राजु नवघरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदरील प्रकरणाची लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले तसेच आठ दिवसांत कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला.. यावेळी मात्र सभागृहाने तात्काळ दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदरील प्रकरण वास्तव असून कारवाईला आठ दिवसांची गरज नसून आजच जिल्हाप्रशासनास तात्काळ कारवाईसाठी आदेशीत आदेशही करण्यात येईल असे सांगितले. याबाबत दै सकाळने वेळोवेळी बातमी प्रकाशीत करुन लोकप्रतिनिधींचे व सर्वसामान्यांचे लक्ष वेधले हैते हे विशेष.