Suresh Dhas : अवैध राख वाहतूक करणारे शोधा; आमदार सुरेश धस, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर साधला निशाणा
Illegal Ash Transport : आमदार सुरेश धस यांनी परळी वैजनाथ येथील राख वाहतुकीसाठी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. यामुळे नागरिकांना होणाऱ्या आरोग्य समस्यांवर कारवाई का होत नाही, हे त्यांनी प्रश्नांकित केले.
छत्रपती संभाजीनगर : परळी वैजनाथ (जि. बीड) येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीमुळे शहर व परिसरातील नागरिकांना अनेक आजारांसह समस्यांना सामोरे जावे लागत आहे.