वडिलांना वाचवू शकले नाही, मनोजदादांना तरी त्यांच्या मागण्या पूर्ण करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचवावे, असे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली.
-दिलीप दखणे
वडिगोद्री : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे (Manoj Jarange) व सहकारी हे आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी पाचव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले आहे. या ठिकाणी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. चार दिवसांत 15 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना अंबड जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल वाघमारे यांनी दिली.