परळी वैजनाथ - येथील महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी १५ महिने होऊनही कसे काय सापडत नाहीत? पोलीस काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करून येथील पोलीस ठाण्यात गेल्या दहा-बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करुन नवीन पोलिसांची नियुक्ती करा अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी (ता. २२) येथे माध्यमांशी बोलताना केली आहे.
शहरातील बँक काँलनीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या खुनाबद्दल माहिती दिली व न्याय मिळण्याच्या मागणीसाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात मंगळवारी (ता. २५) उपोषण करणार असल्याचे सांगितले.
आपल्या पतीचा काही दोष नसताना खून कसा झाला? आरोपींना अटक का केली जात नाही? असे सवाल करत मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपले समाधान होणार नाही, असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. तर सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले की, महादेव मुंडे खून प्रकरणात अद्याप पर्यंत एकही आरोपी निष्पन्न झाला नाही व आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.
शहर पोलिसांना या प्रकरणात आरोपी निष्पन्न करता आले नाही, आरोपी १५ महिन्यानंतर अटक का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आरोपी लवकर सापडतील अशी आशा विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व चार हवालदार या प्रकरणाचा आता तपास करत आहे. पोलीस निरीक्षक साबळे हे चांगले आहेत. निश्चितच या प्रकरणातील आरोपी सापडतील अशी आशा आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली यावेळी त्यांच्यासोबत राजेसाहेब देशमुख,सतीश फड उपस्थित होते.
आमदार सुरेश धस यांना दाखवले काळे झेंडे
आमदार सुरू धस यांचा ताफा परळीत आल्यानंतर तो बँक काँलनीकडे महादेव मुंडे यांच्या घराकडे जात असताना काही युवकांनी सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत. सुरेश धस मुडदाबाद च्या घोषणादेत काळे झेंडे दाखवत निषेध केला. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. तात्काळ या युवकांना बाजूला करत सुरेश धस यांचा रस्ता रिकामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.