भूम - गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज प्रशासनाला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले.