गेवराई - मस्साजोग (ता. केज) सरपंच संतोष देशमुख हत्येचा उत्तरीय तपासणी केलेल्या डॉक्टरांनी सांगितलेला शब्द् न् शब्द् गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गुरुवारी (ता. १९) हिवाळी अधिवेशनात सभागृहात सांगितला..मस्साजोग येथील तीन टर्मपासून सरपंच असलेले संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने बीड जिल्हा चांगलाच हादरला आहे. सरपंच हत्येप्रकरणी बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित हे आमदार आक्रमक झाले आहेत..आज गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांची उत्तरीय तपासणी करणा-या डॉक्टरांनी सांगितलेल्या शब्द् न् शब्दाचा पाढा हिवाळी अधिवेशनात सभागृहात सांगितला. यावेळी बोलताना आमदार पंडितांनी सांगीतले की, घटनेनंतर देशमुख कुटुंबीय यांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर मृत सरपंच यांचे ज्या डॉक्टरांनी शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) केले यांच्याशी फोनवरून माहीती घेतली..मृतदेहाची काय अवस्था होती? याची माहीती देताना शरीरातील अवयवांवर एवढा मार दिला होता की, किडनी, लिव्हर, बरगड्या याचा पुर्ण चेंदामेंदा केला होता. इतक्या निर्घृणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे सांगून पंडितांनी सरकार काय असतय? जिथे अन्याय झालाय तिथे न्याय दिला पाहीजे..एवढेच नाहीतर या हत्या प्रकरणात केज पोलिसांचा हलगर्जीपणा दिसला. केज पोलिसांवर कारवाई करुन मृत संतोष देशमुख खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी विजयसिंह पंडित यांनी आज सभागृहात केली..तीन टर्मपासून सरपंच असलेले संतोष देशमुख हे आजही पत्र्याच्या घरात रहात आहेत. एक पंचवार्षिक होताच सरपंच चारचाकी घेऊन फिरताना माझ्या निदर्शनास आल्याचे देखील पंडित यांनी यावेळी सांगीतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.